नवी दिल्ली – तेलंगणाचे मुख्यमंत्री  के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी गुरूवारी 6 सप्टेंबरला सकाळी मंत्रीमंडळाची बैठक घेतली. यामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर मुख्यमंत्री केसीआर यांनी राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांची भेट घेत राज्याची विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली. त्यानंतर राज्यपालांनीही तेलंगणा विधानसभा बरखास्त केली आहे. तसेच नवीन सरकार स्थापन होईपर्यंत चंद्रशेखर राव यांना प्रभारी मुख्यमंत्री म्हणून पदावर राहण्याचा आग्रह केला आहे.

साल 2104 मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या तेलंगणामध्ये विधानसभेसाठी प्रथमच निवडणूक पार पडली होती. तेलंगाणा विधानसभेची मुदत ही 2019 मध्ये संपणार होती. विधानसभा आणि लोकसभा अशी एकत्र निवडणूक होणे नियोजित होते. मात्र राज्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. त्यामुळे आता 2019 च्या निवडणुकीआधीच तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)