बिहारची कायदा व सुव्यवस्था ढासळली : तेजप्रताप यादव

तक्रार नोंदवून घेण्यासाठी होते चालढकल

पाटणा – बिहारची कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. राज्यात कोणीही सुरक्षित नाही. आता मलाही बिहारमध्ये भीती वाटते, अशा शब्दांत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर हल्ला चढवला आहे. तेजप्रताप आता जनता दरबार भरवून ते सामान्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. बिहारमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेजप्रताप राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांना जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या दरबारात समस्या मांडण्यासाठी सामान्यांची गर्दी होत आहे. ते लहान लहान गावांमध्ये जाऊन जनतेशी संपर्क वाढवत आहेत. एका महिलेची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांनी पाटण्यातील एका पोलीस ठाण्यासमोरच धरणे आंदोलन केले.

पोलीस ठाण्यातील अधिकारी तक्रार नोंदवण्यास चालढकल करत असून महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी नितीशकुमार यांच्याकडे केली आहे. मात्र, सरकार अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राज्यातील गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. येथे कोणीही सुरक्षित नाही. त्यामुळे आपली सुरक्षा वाढवण्याची मागणीही त्यांनी केली. आपल्याकडे राज्यातील पोलीस ठाण्याबाबतच्या अनेक तक्रारी येत आहेत. अनेक अधिकारी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करत नसल्याने राज्यात जंगलराज आल्याचा आरोप त्यांनी केला.

गुन्हेगारांच्या कारवाया वाढत आहेत आणि सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. राज्यातील गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी नितीश सरकारने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी कुंदन कृष्णन यांच्या नेतृत्वाखाली मुख्यालय स्थापन करण्यात आले आहे. तर 23 अधिकाऱ्यांकडे नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थिती सुधारेल असे सरकारचे म्हणने आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)