घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर तेजप्रताप यादव अजूनही ठाम

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी पत्नीशी घटस्फोट घेण्याचा अर्ज न्यायालयात सादर केलेले लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यावर कुटुंबातील इतर सदस्यांत मतभेद निर्माण झाल्यामुळे तेजप्रताप हरिद्वार येथे आले आहेत. कुटुंबाने आपल्या घटस्फोटाला मान्यता देईपर्यंत घरी परतणार नाही, असा निर्धार त्यांनी केल्याचे समजते.

तथापि, लालू यादव आणि इतरांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यामुळे तेजप्रताप आणि कुटुंबीय यांच्यातील दुरावा वाढला असून लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात चिंतेचे वातावरण आहे. तेजप्रताप यांनी पक्षासाठी काम करावे असे कार्यकर्त्यांना वाटते.

-Ads-

तेजप्रताप यांच्या पत्नी बिहारच्या माजी मंत्र्यांच्या कन्या असून त्यामुळे या सर्व प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झाला आहे. ऐश्वर्या यांच्या कुटुंबाचाही घटस्फोटाला विरोध आहे असे सांगण्यात येते. ऐश्वर्या यांनी आतापर्यंत मौन बाळगले आहे. त्यामुळे प्रकरणातील गुंता वाढला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)