तेजबहादूर यादव मोदींविरोधात निवडणूक लढवणार

चंडीगढ  – सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) बडतर्फ करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा संकल्प जाहीर केला आहे. बीएसएफच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याची तक्रार केल्यामुळे सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांचे नाव मोठ्या चर्चेत आले होते.

हरियाणाचे रहिवासी असणाऱ्या यादव यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना निवडणूक लढवण्याचा मनोदय बोलून दाखवला. मी अपक्ष उमेदवार म्हणून उत्तरप्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून मोदींविरोधात निवडणूक लढवणार आहे. सुरक्षा दलांमधील भ्रष्टाचार संपवण्याच्या इराद्याने मी निवडणूक लढवणार आहे. मी सेवेत असताना भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, मला बडतर्फ करण्यात आले, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत जम्मू-काश्‍मीरच्या बर्फाळ, पर्वतमय भागांत तैनात असणाऱ्या जवानांना हलक्‍या दर्जाचे अन्न पुरवले जाते अशी तक्रार करणारा व्हिडीओ यादव यांनी 2017 मध्ये सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्या व्हिडीओवरून वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर बेशिस्तीच्या आरोपावरून यादव यांना बीएसएफच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)