पुणे – आणखी मार्गांवर सुरू होणार “तेजस्विनी’

पुणे – महिला प्रवाशांचा मिळता प्रतिसाद लक्षात घेऊन पीएमपीएमएल प्रशासनाकडून “तेजस्विनी’ बसेसची सेवा आणखी काही मार्गांवर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मार्गांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार असून हे मार्ग लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

महिलांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी गत महिला दिनाचे औचित्य साधून बारा मार्गांवर “तेजस्विनी’ सेवा सुरू केली होती. महिलांची सर्वाधिक गर्दी असणारे शहर आणि उपनगरांमध्ये आणखी पंधरा ते वीस मार्ग आहेत. शिवाय अन्य मार्गावरही अशी सेवा सुरू करण्याची मागणी होत असून त्यासंदर्भात प्रशासनाला सह्यांचे लेखी निवेदनही मिळाले आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)