स्वकुटुंबीयांचाच ऐश्‍वर्याला पाठिंबा तेजप्रताप यादव यांची खंत 

पाटणा – घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव याने आपल्याच कुटुंबाविरोधात आरोप केले आहेत. आपल्या नात्यात दुरावा येण्यामागे आपलं कुटुंब जबाबदार असल्याचं तेज प्रताप यादव याचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर आपल्याविरोधात कट आखला जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

कुटुंबातील प्रत्येक जण ऐश्वर्याला पाठिंबा देत आहे. मी गेल्या दीड महिन्यांपासून तिच्या संपर्कात नव्हतो. पण अचानक ती पुन्हा घरी परत आली असून माझ्या कुटुंबीयांकडून तिला समर्थन मिळत आहे. या सगळ्यामागे मोठा कट आहे, आणि माझे कुटुंबीय त्यात सहभागी आहेत, असं तेजप्रताप यादवने म्हटलं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाटणा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर तेज प्रताप यादव याने आपले वडील आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची रांचीतील रुग्णालयात जाऊन भेट घेतली. लालू यादव यांचादेखील तेज प्रतापला पाठिंबा नसल्याचं दिसत आहे. मात्र तेजप्रतापने आपला निर्णय ठरवला आहे. वडिलांनी मला थोडं थांबण्याचा सल्ला दिला आहे, पण मी माझा निर्णय बदलणार नाही, असं तेजप्रताप यादव बोलले आहेत. याआधी तेजप्रतापने मी एक साधाभोळा माणूस आहे. इच्छेविरुद्ध माझं ऐश्वर्या राय बरोबर जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं. तेव्हापासून माझा कोंडमारा सुरू होता असे म्हटलं होतं. ऐश्वर्या राय Politics entry करणार असल्याची चर्चा सुरू असताना अचानक हे घटस्फोटाचे वृत्त आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)