नवी दिल्ली – श्रावण महिना महादेवाचा मानला जातो. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा व बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांनी महादेवाचे रुप धारण करत पटनामधील एका महादेव मंदिरात पूजा अर्चना केली. तेज प्रताप यादव यांना या फोटोमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
तेज प्रताव यादव यांनी संपूर्ण शरीराला भस्म लावले असून गळ्यात रूद्राक्षाची माळ घातली होती. त्यांनी पांढऱ्या रंगाचे धोतर गुंडाळले आहे. तेज प्रताप यादव राजकारणापेक्षा त्यांच्या लुकसाठीच जास्त चर्चेत असतात. यापूर्वी देखील सरस्वती पूजेदरम्यान तेज प्रताप यांचा अनोखा अंदाज आणि हटके लुक पाहायला मिळाला होता. मकर संक्रांतीवेळी तेज प्रताप यादव यांनी श्री कृष्णाचे रूप धारण केले होते. यानंतर त्यांचा जिलेबी तळत असल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता.