संपात सहभागी व्हाल, तर शिस्तभंग

आजपासून संप : तंत्रशिक्षण विभागाचा इशारा

पुणे – राजपत्रित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. 7 ते 9 ऑगस्ट असे तीन दिवस संप पुकारला आहे. या संपात तंत्रशिक्षणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेऊ नये, अशा सक्‍त सूचना तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. संपात सहभाग होणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.

-Ads-

याबाबतचे परिपत्रक पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी आज प्रसिद्ध केले आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार “काम नाही, वेतन नाही’ हेच धोरण राज्य शासनाचे आहे. तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी संपात भाग घेणे ही गैरवर्तणूक समजण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संप कालावधीत कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांची रजा मंजूर केली जाणार नाही. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या दरम्यान कार्यालयीन वेळेपूर्वी कामावर उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. त्यामुळे व्यावसायिक पदविका व पदवी अभ्यासक्रम संस्थांनी ही बाब सर्वांच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही नंदनवार यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)