दुसऱ्या दिवसअखेर भारत 4 बाद 308; ‘रहाणे आणि पंत’ यांची 146 धावांची भागीदारी

हैदराबाद –  काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्टइंडिज संघाच्या 7 बाद 295 धावा झाल्या होत्या. आज पुढे खेळताना कालच्या धावसंख्येत वेस्टइंडिज संघाला केवळ 16 धावांची भर टाकता आली आणि त्यांचा पहिला डाव 311 वर आटोपला. रोस्टोन चेज याने आज आपले शतक पूर्ण केले. तो 106 धावांवर बाद झाला.भारताकडून पहिल्या डावात उमेश यादव याने सर्वाधिक 6 तर कुलदीप यादव याने 3 तर रविचंद्रन आश्विन याने 1 बळी घेतला.

वेस्टइंडिजचा पहिला डाव 311 वर आटोपल्यानंतर भारतीय फलंदाजानी सुध्दा पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली आहे. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या 4 बाद 308 धावा झाल्या आहेत. भारत केवळ 3 धावांनी पिछाडीवर आहे. खेळपट्टीवर अजिंक्य रहाणे 75 तर ऋषभ पंत हा 85 धावांवर नाबाद होते.

-Ads-

आज भारताचा सलामीवीर लोकेश राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो 4 धावा करून बाद झाला. मात्र पृथ्वी शाॅ याने पहिल्या कसोटी सामन्यासारखीच फलंदाजी करत 53 चेंडूत (11 चौकार, 1 षटकरांसह) 70 धावा केल्या. शाॅ बाद झाल्यानंतर आलेल्या चेतेश्वर पूजारा सुध्दा जास्त काळ टिकला नाही, तो 10 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने याने 45 धावा केल्या. त्यानंतर अंजिक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरला आणि 146 धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या 300 पार नेली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)