दोन्ही संघासाठी संघनिवडच मोठी कसोटी 

भारत  विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रीज मैदानावर होणार आहे. हा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. पाच सामन्याच्या मालिकेत इंग्लंड २-० असा आघाडीवर आहे. इंग्लंड हा सामना जिंकून कसोटी मालिका जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरेल तर भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेत परत येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल.

या मालिकेत भारतीय संघ आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. भारतीयांसाठी फालंदाजांचे अपयश आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात चुकलेली संघ निवड या सामन्यात देखील डोकेदुखीची कारणे ठरू शकतात.

इंग्लंडचा संघाला उत्तम सूर गवसला आहे. पहिला कसोटी सामना जिंकल्यावर दुसर्या कसोटी सामन्यात त्यांनी भारतीय संघाला डोके वर काढण्याची थोडीही संधी दिली नाही. या  कसोटी सामन्यात त्यांचा अष्टपैलू खेळाडू  बेन स्टोक्स संघात पुनरागमन करू शकतो. परंतु त्याच्या येण्यामुळे संघातील कोणाचे स्थान धोक्यात येईल हे सांगणे कठीण आहे.

पहिल्या सामन्यातील सामनावीर सॅम करीन की  दुसऱ्या सामन्यात स्टोक्स ऐवजी संघात स्थान मिळालेला दुसर्या सामन्यातील सामनावीर ख्रिस वोक्स या दोघांपैकी एकाला संघातील स्थान गमवावे लागणार आहे. भारतीय संघात देखील संघ निवडीचा पेच आहे.  दिनेश कार्तिक ऐवजी रिषभ पंत याला आज खेळण्याची संधी मिळू शकते. जर संधी मिळाली तर हा सामना रिषभ पंत  याचा पदार्पणाच्या सामना ठरू शकतो. सामन्यात उतरण्याच्या अगोदर  दोन्ही संघासाठी संघनिवड करतानाच खरी कसोटी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)