#NZvInd : भारतीय संघाचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

हॅमिल्टन – भारत वि न्यूझीलंड याच्यांतील तीन सामन्याच्या टी-20 क्रिकेट मालिकेतील अखेरचा सामना हॅमिल्टन येथील सेड्डोन पार्क मैदानावर सुरू होणार आहे. तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीचा कौल भारतीय संघाने जिंकला असून कर्णधार रोहित शर्माने प्रथम क्षेत्ररक्षणाचा (गोलंदाजी) निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यात एकतर्फी पराभवातून सावरत दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यावर दोन्ही संघातील खेळाडूंचे लक्ष असणार असून आजचा सामना जिंकून भारतीय संघ न्यूझीलंडच्या धर्तीवरील पहिला टी-20 मालिका विजय मिळवण्यास प्रयत्नशील असणार आहे. तर, दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ भारतीय संघाला पराभूत करत एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यास उत्सूक असणार आहे.

भारतीय संघ – रोहित शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंत, विजय शंकर, एमएसधोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद

न्यूझीलंड संघ –  टिम सीफर्ट, कॉलिन मुनरो, केन विलियमसन, डेरिल मिशेल, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, स्कॉट कुग्गेलिजन, टिम साउदी, ईश सोढ़ी, ब्लेयर टिकनर

https://twitter.com/BCCI/status/1094485502844116993

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)