#हाॅकी_विश्वचषक_स्पर्धा_2018 : भारताची दमदार विजयी सलामी

भुवनेश्वर – भारतीय हाॅकी संघाने हाॅकी विश्वचषकाची सुरूवात दमदार केली आहे. भारतीय संघाने हाॅकी विश्वचषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण अाफ्रिकेचा 5-0 ने पराभव करत दमदार विजयी सलामी दिली आहे.

भारताीय संघाकडून सिमरनजित सिंगने 43 आणि 43 व्या मिनिटाला असे 2 गोल केले. मनदीप सिंगने 10 व्या मिनिटाला, आकाशदीप सिंगने 12 व्या मिनिटाला आणि ललित उपाध्यायने 45 व्या मिनिटाला गोल करून भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

-Ads-

दक्षिण आफ्रिका संघाला या सामन्यात एकही गोल करता आला नाही.  जागतिक क्रमवारी पाहता भारतीय संघ हा 5 व्या स्थानी तर दक्षिण आफ्रिकेचा संघ हा 15 व्या स्थानी आहे. या लढतीत भारतीय संघाचे पारडे जड मानले जात होते, आणि त्याप्रमाणेच भारताने खेळ करत दमदार विजय मिळविला. आता भारताची दुसरी लढत ही 2 डिसेंबरला बेल्जियमविरूध्द होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)