विराटला विश्रांती, रोहितकडे कर्णधार पदाची धूरा

नवी दिल्ली – युएईत येथे 15 सप्टेंबरपासून सूरू होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार आणि फलदांज विराट कोहली याला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

आशिया चषकासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद  रोहित शर्मा यांच्याकडे देण्यात आले आहे. तर उपकर्णधार म्हणून शिखर धवन यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. 15 सप्टेंबर पासून युएईत आशिया चषक स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्राच्या केदार जाधवने भारतीय संघात पुनरागणन केले आहे. खलिल अहमद या नवोदीत खेळाडूला भारतीय संघात जागा मिळाली आहे.

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उप-कर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायडू, मनिष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह,भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि नवोदीत खेळाडू खलिल अहमद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)