महिला एएफसी आॅलिंपिक 2020 पात्रता स्पर्धा : ‘भारत-म्यानमार’ लढत आज

यांगाव – भारतीय महिला फुटबाॅल संघाची 2020 एएफसी आॅलिंपिक पात्रतेच्या स्पर्धेत आज (मंगळवारी)  पाच वाजता म्यानमार महिला फुटबाॅल संघाविरूध्द लढत होणार आहे.भारतीय महिलांची आजची या गटातील तिसरी आणि अंतिम लढत आहे. पहिल्या लढतीत भारतीय संघाला नेपाळविरूध्द 1-1 असे समाधान मानावे लागले होते. मात्र स्पर्धेतील दुसऱ्या लढतीत भारतीय संघाने बांगलादेशवर 7-1 अशी मात करत विजय संपादित केला होता.

दरम्यान, म्यानमार संघाने पहिल्या लढतीत बांगलादेशविरूध्द 5-0 ने विजय मिळवला होत तर दुसऱ्या लढतीत नेपाळविरूध्द त्यांना 1-1 असे समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आजची लढत भारत आणि म्यानमार साठी अंत्यत महत्वाची असणार असून दोघांही संघाचा विजय मिळविण्याचा प्रयत्न असणार आहे.

-Ads-

दोन सामन्यानंतर भारतीय महिला संघाचे एकूण 4 गुण झाले आहेत. बांगलादेशविरूध्दच्या लढतीत बालादेवीने चार गोल केले होते, त्यामुळे परत अशाच कामगिरीची तिच्याकडून अपेक्षा भारतीय चाहत्यांना असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)