विश्वकरंडकासाठी टीम इंडियाची आज घोषणा

पुण्याच्या केदारची निवड ऐतिहासिक ठरणार


प्रा. संजय दुधाणे

पुणे – सध्या देशात निवडणूक आणि आयपीएलचे वारे वाहत असले तरी जगभरातील क्रिकेट शौकिनांना विश्‍वकरंडक स्पर्धेची उत्कंठा लागली आहे. क्रीडाविश्वातील भारतासाठी सर्वाधिक महत्त्वाची समजली जाणारी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा 30 मे ते 14 जुलै 2019 दरम्यान इंग्लंड व वेल्समध्ये रंगणार असून भारतीय संघाची घोषणा सोमवारी 15 एप्रिल रोजी होत आहे. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि कोणाची अंतिम 15 संघात वर्णी लागणार याकडे साऱ्या क्रिकेटविश्‍वाचे लक्ष वेधले आहे.

गत स्पर्धेत अजिंक्‍य रहाणे हा एकमेव मराठमोळा खेळाडू होता. यंदा केदार जाधव हा मराठमोळा क्रिकेटपटू प्रथमच विश्‍वकरंडच्या भूमीत झळकताना दिसेल. केदारची निवड ही पुण्यासाठी व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकरीता ऐतिहासिक असणार आहे. कारण तो विश्‍वकरंडक खेळणारा पहिलाच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा खेळाडू ठरणार आहे. प्रथमच पुण्याचा चेहरा विश्‍वकरंडक स्पर्धेत दिसणार आहे. संधीचे सोने करण्यासाठी केदारनेही कंबर कसली आहे. धोनीसोबत मॅचविनरच्यी भूमिका तो ब्रिटिश मैदानातही करताना दिसेल. मधल्या फळीतील केदारला विजय शंकरकडून भिती असेल. केदार की शंकर असा पेच निवड समितीला सोडवावा लागणार आहे.

क्रिकेट पंढरीत होणाऱ्या क्रिकेट कुंभमेळ्यासाठी सर्वप्रथम न्यूझिलंडने आपला संघ जाहिर केला आहे. आता सोमवारी भारताचे शिलेदार सज्ज होतील. विश्‍वकरंडकाच्या मोहिमेसाठी टीम इंडियाचे नेतृत्व प्रथमच विराट कोहलीच्या हाती येईल. गत स्पर्धेतील महेंद्रसिंग धोनीसह, आयपीआय गाजवित असलेला रोहित शर्मा, शेखर धवन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी हे अनुभवी पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणांगणात झुंजताना दिसतील.

वानखेडे स्टेडियमवर 2011 मध्ये षटकार झळकावित महेंद्रसिंग धोनीने दुसर्यांदा विश्वकरंडकावर भारताचे नाव कोरले होते. पुन्हा धोनीचे नेतृत्व असफल ठरले. गत स्पर्धेत कांगारूंनी उपांत्यफेरीतच आपले रथ रोखला होता. गेल्या चार वर्षांत टीम इंडियाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. नव्या दमाच्या खेळाडूंनी भारतीय संघ यंदाही विजेतेपदाचा दावेदार आहे. टीम इंडिया पुन्हा जोशात आहे. भले शेवटच्या एकदिवसीय मालिकेत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताला हरवले असले तरी.

भारतररत्न सचिन तेंडुलकरचे विश्वकरंडकाचे स्वप्न साकार करणारा धोनी तिसर्यांदा विश्वकरंडकच्या मैदानात दिसणार आहे. धोनीने निवृत्त व्हावे अशी बोचरी टिका सतत होत असताना त्याने आपण संघासाठी कितपत फायदेशीर आहोत हे ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड दौर्यात दाखवून दिले आहे. धोनी चौथ्यांदा विश्वकरंडक स्पर्धेत चमक दाखविण्यास उत्सुक आहे. तोच संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू असल्याने त्याच्यावर संघाची मोठी भिस्त असेल.

मधल्या फळीत धोनीसोबत खेळाता पुण्याच्या केदार जाधवनेही आपली संघातील जागा मजबूत केली आहे. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद समोर चौथ्या क्रमांकासाठी कोणाला निवडायचे हे मोठे आव्हान आहे. आयपीएलमध्ये धडाकेबात कामगिरी करणारा के. एल. राहुल हा चौथ्या स्थानासाठी योग्य खेळाडू असल्याने लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी मत व्यक्त केले आहे. तरी कोहलीची चौथ्या स्थानाकरीता पसंती ही अम्बाती रायडूला असण्याची शक्‍यता आहे.

गत विश्वकरंडक स्पर्धेचा अनुभव पाठीशी असणारा दिनेश कार्तिकही चौथ्यासाठीचा खेळाडू ठरू शकतो. गेल्या वर्षभरात त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याने रायडू किंवा राहुलच्या नावाचा विचार अधिक होण्याची शक्‍यता आहे. राहुल, कार्तिक आणि षभ पंत हे तिघेही यष्टीरक्षक असल्याने या तिघांपैकी एकाचाच विचार पर्यायी खेळाडू तसेच यष्टीरक्षक म्हणून केला जाणार आहे.

निवड समितीच्या यादीत मुंबईचा पृथ्वीराज शॉ आणि दिल्लीचा जलदगती गोलदांज नवदिप सैनी हे डार्क हॉर्स आहेत. इंग्लंडच्या लहरी हवामानात खेळताना तीन वेगवान, एक फिरकीसह एक अष्टपैलू अशी विराट ही व्युहरचना असेल. यासाठी अष्टपैलू म्हणून पुण्याच्या केदार जाधव हे नाव पुढे येईल. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड दौरा गाजविणारे यजुवेंद्र चहल, कुलदिप यादव, जसप्रित बुमराह यांच्यावर मोठी भिस्त असणार आहे.

जगभरातील 10 संघाची रणधुमाळी मे महिन्याच्या अखेरीस ब्रिटिश भूमीत सुरू होईल. 5 जूनचा भारताची दक्षिण आफ्रिकेची सलामी असली तरी पाकिस्तान विरूध्दची झुंजही भारतासाठी अधिक लक्षवेधी ठरणार आहे. 9 संघाविरूध्द लढा देत 14 जुलै रोजी क्रिकेट पंढरी लॉर्डस्वर भारत खेळताना दिसो व कपिल देवप्रमाणे विराटही लॉर्डस्वर विश्वकरंडक उंचविताना दिसेल, त्यापूर्वी संभाव्य 15 खेळाडू कोण याचे उत्तर आपल्या हाती येण्यास काही घटिकाच राहिल्या आहेत.

संभाव्य भारतीय संघ – विराट कोहली – कर्णधार , रोहित शर्मा – उपकर्णधार, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी – यष्टीरक्षक, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, कुलदिप यादव, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी

राखीव – विजय शंकर, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा / अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, लोकेश राहुल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)