#INDvAUS T20 : पहिल्या सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर

नवी दिल्ली – भारतीय संघ आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 3 टी-20 सामन्यांनी करणार आहे. त्यानंतर चार कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

दोन महिन्यांच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील आपल्या पहिल्या टी20 क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघाने अंतिम 12 सदस्यीय खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या 12 सदस्यीय खेळाडूंपैकी 11 खेळाडू हे अंतिम संघात बुधवारी होणाऱ्या पहिल्या टी20 क्रिकेट सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया विरूध्द मैदानात उतरतील.

-Ads-

ब्रिस्बेन येथे होणाऱ्या या टी20 क्रिकेट सामन्यात ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून तर दिनेश कार्तिक याला फलंदाज म्हणून अंतिम 12 मध्ये निवडण्यात आले आहे. वेस्ट इंडीज विरूध्दच्या तीन टी20 सामन्याच्या मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर विराट कोहली यांचे संघात पुनरागमन करत आहे.

भारताने सामन्याच्या एक दिवसपूर्वी अंतिम 12 खेळाडूची नावे जाहीर करण्याचा ट्रेन्डं हा वेस्टइंडीज विरूध्दच्या मालिकेपासून सुरू केला आहे आणि आताही या मालिकेदरम्यान चालू ठेवला आहे.

पहिल्या टी20 क्रिकेट सामन्यासाठी अंतिम 12 खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत( यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि युजवेंद्र चहल.

What is your reaction?
713 :thumbsup:
287 :heart:
86 :joy:
122 :heart_eyes:
379 :blush:
122 :cry:
256 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)