#AUSvIND : भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर

मेलबर्न – रविंद्र जडेजाची फिरकी गोलंदाजी आणि जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, इशांत शर्मा यांनी केलेल्या वेगवान भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मेलबर्न कसोटीत विजयाच्या उंबरवठ्यावर पोहोचला आहे.

आज चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया संघाच्या दुसऱ्या डावात 85 षटकात 8 बाद 258 धावा झाल्या आहेत. आज चौथा दिवसाच्या खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाचे नाथन लिओन नाबाद 6 आणि पेट कमिन्स नाबाद 63 धावांवर खेळत आहेत. भारतीय संघाला विजयासाठी केवळ 2 गडी बाद करण्याची आवश्यकता आहे तर ऑस्ट्रेलिया संघाला पराभव टाळण्यासाठी 140 धावांची आवश्यकता असून त्याचे 2 फलंदाज शिल्लक आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान भारताने आपला दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित केला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचे आव्हान मिळाले. दुसऱ्या डावात मयंक अग्रवालने 42 आणि ऋषभ पंतने 33 धावा केल्या. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या पेट कमिन्सने 27 धावा देत भारताचे 6 गडी माघारी धाडले.

ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद 151 धावांपर्यतच मजल मारता आली होती. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर लवकर बाद झाले. मार्कस हॅरिस 13 आणि आरोन फिंच 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर उस्मान ख्वाजा 33, शाॅन मार्श 44 , ट्रेैविस हेड 34, मिचेल मार्श 10, टिम पेन 26 आणि मिचेल स्टार्क 18 धावांवर बाद झाला.

भारताकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर रविंद्र जडेजाने 3 आणि इशांत शर्माने 1 गडी बाद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)