पदवीधर शिक्षकांचे जिल्हा परिषदेत धरणे

नगर – शासनाच्या 14 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार पदवीधर शिक्षकांची वेतन निश्‍चिती, समाईक सेवाज्येष्ठतेत योग्य स्थान निश्‍चिती आणि पदोन्नतीबाबतची कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी जिल्ह्यातील पदवीधर शिक्षकांनी केली आहे. या मागणीसाठी शिक्षकांनी एकत्र येत जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागासमोर धरणे आंदोलन केले.

यात पदवीधर समन्वय समितीचे राज्य समन्वयक मिलिंद काळपुंड, वेणुनाथ ठोंबरे, रवींद्र पटेकर, बाळासाहेब भोसले, प्रकाश आरोटे, विरेश नवले, रामदास धनवडे, शिवाजी गोर्डे, मच्छिंद्र जाधव, जी.के.रामफळे, संजय चव्हाण, बाळकृष्ण चोपडे आदी सहभागी झाले होते.

-Ads-

शासनाच्या परिपत्रकास दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होवूनही शिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी परिपत्रकानुसार कार्यवाही करीत नसल्याने शासन निर्णयाच्या लाभापासून पदवीधर शिक्षक वंचित राहत असल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले.

शासन निर्णयानुसार समाईक सेवाज्येष्ठता यादी तयार करावी, या परिपत्रकानंतर दिलेल्या पदोन्नती तात्काळ रद्द कराव्यात, सेवाज्येष्ठतेबाबत निर्माण झालेल्या व होत असलेल्या कायदेशीर प्रकरणाबाबत संदर्भीय शासन निर्णयानुसार त्वरित सुनावणी घेवून प्रकरणे निकाली काढावीत, शैक्षणिक संस्थांना येणाऱ्या पगार पत्रकांच्या देयकासोबत शासन निर्णयानुसार 2018 ची सेवाज्येष्ठता यादी तयार करणे बंधनकारक करावे, आदी मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी दिले आहे.

आंदोलनात बापूसाहेब गायकवाड, दिलीप वाकचौरे, प्रकाश डोळस, नानासाहेब भोर, विजय हुसळे, भिमराज आव्हाड, सुनिल भिंगारदिवे, शंकरराव शिंदे, प्रताप आहेर आदींसह जिल्ह्यातील शिक्षक सहभागी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)