शिक्षकाने ठविल्यास देशाची व्यवस्था बदलेल

राहुरी विद्यापीठ : कृषी विद्यापीठातील शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. एम. सी. वार्ष्णेय.

माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय : महात्मा फुले कृषी विद्यापीठात शिक्षक दिन

राहुरी विद्यापीठ – गुरूंचा सन्मान करणे आणि पूजा करणे ही आपल्या देशाची पूर्वापार परंपरा आहे. आई, वडिल आणि शिक्षक यांना आपण गुरूंचे स्थान दिलेले आहे. शिक्षकाला माया, पैसा, पदाचा कोणताच मोह नसतो. शिक्षक उत्तम शिक्षण देतो, योग्य दिशा देतो आणि विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतो. शिक्षण हे देशाच्या विकासाचा पहिला टप्पा आहे. शिक्षकाने ठरविले तर तो देशाची व्यवस्था बदलू शकतो असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी वार्ष्णेय बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र पाटील, कुलसचिव आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, वनस्पती शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब भारुड, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चिंतामणी देवकर, विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. मिलिंद अहिरे, जीव रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजीव नाईक, कृषी किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दादाभाऊ पोखरकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी शरद पाटील उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)