समाज विकासासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

आशुतोष काळे : एसएसजीएम महाविद्यालत सांस्कृतिक विभागाचा शिक्षक दिन 

कोपरगाव – इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही अमूलाग्र बदलाची आवश्‍यकता आहे. शिक्षकांना सामाजिक जीवनात समाधानी ठेवले तर सामाजहिताची जपणूक करणे शक्‍य होईल. समाज विकासासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांतील कल्पकता विकसित करण्यासाठी शिक्षक दिनाचे आयोजन होते ही बाब कौतुकास्पद असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आशुतोष काळे यांनी सांगितले.

एसएसजीएम महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे होते.

आशुतोष काळे म्हणाले की, शिक्षक दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांची सफलता, गुणवत्ता सर्वांसाठी आनंददायी असते. नवीन पिढीच्या सफलतेवर समाजाचा विकास अवलंबून आहे. त्यामुळे नव्या पिढीच्या विचारांबाबत शिक्षकांनी जागरुक असणे गरज त्यांनी व्यक्‍त केली.

शिक्षकांबरोबर सुसंवाद साधून समाजहिताची जाणीव ठेवूनच समाजाचा विकास करण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य कारभारी आगवन, विजय आढाव, डॉ. शीला गाढे, सुनील देवकर, डॉ. नीलेश मालपुरे व कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी आदी उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालायचे उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब निघोट, डॉ. कांदळकर, प्रा. संजय शेटे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)