टीडीपी तेलंगणात निवडणूक लढवणार नाही 

हैदराबाद – तेलगु देसम पक्षाने तेलंगणात लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पक्षाने तेथे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा अप्रत्यक्ष लाभ तेलंगणा राष्ट्रीय समिती आणि भाजप या पक्षांना होऊ शकतो तो होऊ नये म्हणून आपण हा निर्णय घेत आहोत असे या पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.

मूळ आंध्रप्रदेशचे विभाजन होण्याच्या वेळी जो भाग तेलंगणा राज्यात गेला, त्या राज्यात तेलगु देसम पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. पण टीआरएस पक्षाने तेलंगणात टीडीपीचे अस्तित्वच राहु नये याचे सतत प्रयत्न केले त्यामुळे टीडीपीचे बहुतेक सारे नेते व कार्यकर्ते टीआरएस पक्षात गेल्याने टीडीपीचे अस्तित्व तेथे अत्यंत नाममात्र राहिले आहे. टीडीपी पक्षाचे पॉलिटब्युरो सदस्य नामा नागेश्‍वर राव यांनीही अलिकडेच टीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर तूर्तास तेलंगणात निवडणूकच न लढवण्याचा निर्णय टीडीपी ने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)