टीडीपी ओडिशात निवडणूका लढणार : नायडू

भुवनेश्‍वर: तेलगु देसम पक्षाने ओडिशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती त्या पक्षाचे प्रमुख व आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यावतीने टीडीपी पक्षाचे ओडिशा राज्याचे निरीक्षक राजेश पुर्ता यांनी आज कोरतापुत येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की ओडिशातील 52 विधानसभा मतदार संघात आणि पाच लोकसभा मतदार संघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत.

ज्या प्रदेशात तेलगु भाषिक नागरीक राहात आहेत त्या प्रदेशांमध्ये पक्ष संघटना मजबूत करून निवडणुका लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की ओडिशाच्या कोरपुत, रायगडा, मलकनगिरी, गजपती, गंजम आणि नवरंगपुर या जिल्ह्यांमध्ये तेलगु भाषिकांची संख्या अधिक असल्याने आम्ही त्या भागात आमच्या पक्षाचे उमेदवार उभे करणार आहोत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)