नवी दिल्ली – आंध्रप्रदेशचे होणारे नवीन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. जगनमोहन रेड्डी यांचा शपथविधी ३० मे रोजी विजयवाडा येथे इंदिरा गांधी महापालिका स्टेडियमवर होणार आहे.
Outgoing Chief Minister of Andhra Pradesh and TDP Chief N Chandrababu Naidu has been invited to swearing-in ceremony of AP CM designate Y. S. Jaganmohan Reddy, on 30th May in Vijayawada. (File pic) pic.twitter.com/Mcv5GCJIxS
— ANI (@ANI) May 28, 2019
जगनमोहन रेड्डी हे आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर रेड्डी यांचे पुत्र होय. वायएसआर काँग्रेसच्या पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी राज्यपाल नरसिंहन यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. तत्पूर्वी विजयवाडा येथील बैठकीत वायएसआर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांची एकमताने निवड करण्यात आली.
दरम्यान, वायएसआर काँग्रेसने लोकसभेच्या २५ पैकी २२, तर विधानसभेच्या १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या आहेत. निवडणूकीत चंद्राबाबू नायडू यांना मिळालेल्या धक्क्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.