चमकदार ताळेबंदामुळे टीसीएसचा शेअर वधारला

सावध गुंतवणूकदारांमुळे मुख्य निर्देशांक स्थिर

मुंबई: टीसीएस कंपनीने मंगळवारी नफा मोठ्या प्रमाणात वाढल्याचा ताळेबंद जाहीर केल्यानंतर आज या कंपनीच्या शेअरची जोरदार खरेदी होऊन शेअरचे भाव पाच टक्‍क्‍यापर्यंत वाढले. मात्र, निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे इतर कंपन्याच्या शेअरचे जास्त व्यवहार न झाल्यामुळे मुख्य निर्देशांक स्थिर राहील्याचे दिसून आले. टीसीएस कंपनीच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यात तब्बल 23.4 टक्‍के वाढ होऊन तो आता 7340 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीला पहिल्या तिमाहीत 5945 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. या तिमाहीत महसूल 15.8 टक्‍क्‍यानी वाढून तो 34461 कोटी रुपये इतका झाला आहे. जो की गेल्या वर्षी या तिमाहीत 29584 कोटी रुपये इतका होता.

कंपनीला मिळत असलेल्या ऑर्डरची संख्या वेगाने वाढत आहे. कंपनीला या तिमाहीत घसलेल्या रुपयाचा चांगला फायदा झाला आहे. कंपनीने प्रति शेअरला 4 रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. कंपनीने यापूर्वी 16 हजार कोटी रूपयाचे बायबॅक केले आहे. कंपनीचा नफा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढेल याचा विश्‍लेषकांना आणि गुंतवणूकदारांना अंदाज नव्हता. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून कंपनीचे शेअर घसरले होते. आता स्वॉफ्टवेअर क्षेत्रातील इतर कंपन्याच्या ताळेबंदाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान बुधवारी बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 26 अंकानी वाढून 36265 अंकावर बंद झाला. तर राष्टीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 1 अंकाने वाढून 10948 अंकावर बंद झाला. निफ्टीने अजूनही 10900 च्या वरील पातळी कायम टेवली असल्याबद्दल गुंतवणूकदरांनी समाधान व्यक्त केले आहे. कंपन्याचे ताळेबंद चमकदार असण्याची शक्‍यता गुंतवणूकदारांना वाटत होती म्हणून काल मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे निर्देशांक आता उंचावले आहेत. आता प्रत्यक्षात कंपन्या कसे ताळेबंद जाहीर करात यावर निर्देशांकाची पुढील दिशा अवलंबून राहण्याची शक्‍यता आहे. काल टीसीएसने ताळेबंदाच्या हंगामाची सुरुवात चांगली केली आहे. मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅप 0.67 टक्‍क्‍यांनी तर स्मॉल कॅप 0.33 टक्‍क्‍यांनी वाढला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)