कराचे दर कमी असण्याची गरज: अझिम प्रेमजी (संस्थापक विप्रो)

…तरच विकसित देशाइतके करसंकलन वाढू शकेल 

बंगळूरू: कराचे दर कमी असतील तर लोक स्वत: होऊन कर देतात. त्यामुळे कर संकलन वाढण्यास मदत होते असे विप्रो कंपनीचे संस्थापक अझिम प्रेमजी यांनी सांगितले. ते म्हणाले की, कराचा दर कमी पातळीवर असल्यास दीर्घ पल्ल्यात महसूल वाढण्यास मदत होत असते.
तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा

-Ads-

माहिती तंत्रज्ञानासारखे तंत्रज्ञान आपल्या पिढीला आता मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. याचा जास्तीत जास्त वापर केल्यास करप्रणाली अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. यामुळे करदात्यांना कर कार्यालयात जाण्याची गरज कमी होत आहे. हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त प्रमाणात वापरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, कर चुकविण्यासाठी जेवढा खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्च जर कर भरण्यात होत असेल तर लोक कर चुकविण्याचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही. येथे कर अधिकाऱ्यांसमोर बोलताना त्यांनी सांगितले की, केवळ काही लोकांडून जास्त कर घेण्यापेक्षा कर भरणाऱ्याची संख्या वाढविल्यास कराचे दर कमी होण्यास मदत होते. केंद्र सरकारने करदात्यांची संख्या वाढविण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. त्याला आता यश येऊ लागले असल्याचे त्यांनी सांगिंतले.

भारतात केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळा कर आकारतात तरी भारतात कराचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी प्रमाण केवळ 16 टक्‍के आहे. तर विकसित देशांत हेच प्रमाण 35 ते 40 टक्‍के इतके असते. जर भारतात करसंकलनाची रक्‍कम वाढली तर सरकारला शिक्षण आणि आरोग्य यासारख्या सुविधा अधिक प्रमाणात देता येतील असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी कराचे दर वाढविण्याऐवजी कर भरणाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, करसंकलन करताना चौकशीसारख्या साधनाचा वापर केला तर कर विभागाबाबत नकारात्मक वातावरण तयार होते. आणि लोक कर देण्याचे टाळतात. केंद्र आणि राज्य सरकारनी अतिशय सामोपचाराने जीएसटी कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.आता त्यातील कराच्या दरांची संख्या कमी होत आहे.

ती आणखी कमी होण्याची गरज आहे. जास्त पेपर वर्क असल्यासही लोक ते काम करण्याचे टाळत असतात, असे त्यांनी सांगितले. आता जीएसटी बऱ्यापैकी रुळू लागले असल्याचे ते म्हणाले. तसेच हे संघ राज्य पद्धतीचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. सरकार कराच्या पैशाचे नेमके काय करते आणि कशा पद्धतीने करते याबाबत अधिक पारदर्शकता असण्याची गरज आहे. जर आपल्या पैशाचा योग्य पद्धतीने वापर होत आहे असे लोकांना वाटले तर त्यामुळे कर चुकवेगिरी कमी होते असे त्यांनी सांगितले. चांगल्या कामासाठी लोक देणग्या ज्या पद्धतीने आपणहोऊन देतात. त्याप्रमाणे लोक कर देतील असे ते म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)