सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार करभरणा केंद्र

– थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाचा निर्णय
– 2018-19 आर्थिक वर्षासाठी सुमारे 1944 कोटींचे उद्दीष्ट
– 1200 कोटींचा कर वसूल
– उर्वरीत उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी उपाययोजना
  
पुणे – महापालिकेचे आर्थिक उत्पन्न घटत असल्याने जास्तीत जास्त मिळकतकर वसुलीसाठी महापालिकेकडून सुट्टीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली. महापालिकेच्या मिळकतकर विभागास 2018-19 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 1944 कोटींचे कर वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले असून सुमारे 1200 कोटींचा कर वसूल झाला आहे. त्यामुळे उर्वरीत उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

महापालिकेची सुमारे 3200 कोटींची थकबाकी असून चालू वर्षातील आणखी सुमारे 600 ते 650 कोटींची वसुली शिल्लक आहे. ही वसुली करण्यासाठी आयुक्तांच्या सूचनेनुसार, विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या शिवाय, बॅंड पथकही नेमण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून ही वसुली सुरू आहे. तसेच नागरिकांनाही थकबाकीच्या नोटीस पुन्हा नव्याने बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिक कर भरण्यासाठी येत असल्याने सुट्टीच्या दिवशीही महापालिकेसह शहरातील कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येत असल्याचे कानडे यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)