34 रुपयांच्या पेट्रोलवर लागतो 36 रुपयांचा कर

नवी दिल्ली – पेट्रोलची खरी किंमत 70 रुपये नव्हे, तर 34 रुपये आहे. पेट्रोलवरचा टॅक्‍स आणि डीलर्स कमिशनला हटवल्यास दिल्ली-एनसीआरमध्ये प्रतिलिटर पेट्रोलसाठी सामान्य माणसाला 34 रुपये मोजावे लागतील. काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ल यांनी लेखी स्वरूपात संसदेत ही माहिती दिली होती.

पेट्रोलवर टॅक्‍स आणि डीलर कमिशन 96.9 टक्‍के पडते. तर डिझेलवर तोच टॅक्‍स 60.3 टक्‍के लागतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने ऑक्‍टोबरमध्ये इंधनाच्या किमतीवरच्या एक्‍साइज ड्युटीमध्ये कपात केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र सरकारने गेल्या वर्षी पेट्रोलच्या माध्यमातून 73,516 कोटी रुपये, तर डिझेलवर 1.5 लाख कोटी रुपयांची एक्‍साइज ड्युटी वसूल केली असल्याचे त्यानी सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)