#MeToo मोहिमेमध्ये नाव आल्याने ‘टाटा’चे वरिष्ठ अधिकारी सक्तीच्या रजेवर

बॉलिवूड, क्रीडा तसेच राजकारण्यांवर #MeToo मोहिमेअंतर्गत आरोप लागल्यानंतर देशभरामध्ये खळबळ उडाली असतानाच आता ‘कार्पोरेट’ क्षेत्रामध्ये देखील #MeToo मोहिमेद्वारे आरोपांची शृंखला सुरु झाली आहे. भारत तसेच संपूर्ण जगभरामध्ये वाहन विक्री क्षेत्रामध्ये अग्रमानांकित असलेल्या ‘टाटा मोटर्सने’ आपल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याचे आरोप झाल्याने त्याला ‘सक्तीच्या रजेवर’ धाडले आहे.

सुरेश रंगराजन नामक कार्पोरेट कम्युनिकेशन विभागाच्या मुख्य सचिवास टाटा मोटर्सने सक्तीच्या रजेवर पाठवले असल्याची माहिती कंपनीच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलद्वारे देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)