जेएलआरच्या सुमार कामगिरीमुळे टाटा मोटर्सला झाला तोटा 

मुंबई: टाटा मोटर्सच्या देशातील काही वाहनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच या कंपनीला पहिल्याच तिमाहीत 1862 कोटी रुपयांच्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. मात्र टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन्‌ म्हणाले की, जग्वार लॅंड रोव्हरच्या बाबातीत काही आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे कंपनीला मर्यादित स्वरूपाचा तोटा झाला आहे.
कंपनीच्या चीनमधील विक्रीतून कमी नफा झाल्यामुळे कंपनीला तोटा झाला असल्याचे त्यांनी सूचित केले. त्याचबरोबर भारतात व्यावसाईक वाहनाच्या क्षमतेत वाढ केल्यामुळेही काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या सर्व बाबी लघु पल्ल्यात परिणाम करणाऱ्या आहेत. दीर्घपल्ल्यात कंपनीचा नफा आणि उत्पादकता वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)