‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ला मिळाली नवी ‘दया बेन’ !

छोट्या पडद्यावरील “तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील फेमस दया बेन अर्थात दिशा वाकनी आता या सिरीयलमध्ये पुन्हा असणार नाही, हे गेल्या महिन्यातच फायनल झाले. तेंव्हापासून या रोलसाठी कोण नवी हिरोईन येणार याची वाट प्रेक्षक बघत होते. आता निर्मात्यांनी अमी त्रिवेदीचे नाव या रोलसाठी फायनल केले आहे. मात्र अद्याप या निर्णयाची अधिकृत घोषणा झालेली नाही. अमी त्रिवेदीला या रोलसाठी विचारले गेले आहे आणि चर्चा खूप सकारात्मक आणि यशस्वी होत आली आहे. मात्र अद्याप अमीने याबाबत कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमी त्रिवेदीने यापूर्वी गुजराथी नाटकांमधून काम केले होते. तिने काही सिरीयलमध्ये कॉमिक लीड रोल केले होते. त्यामुळे तिचा टायमिंग सेन्स सगळ्यांनाच माहिती आहे. दिशा वाकनीला मॅटर्निटी लीव्ह दिली गेली होती. मात्र त्यानंतर तिच्यावतीने निर्मात्यांपुढे अवघड अटी घातल्या. दररोज केवळ 4 तास असे फक्‍त 15 दिवस काम आणि पूर्वीपेक्षा दुप्पट मानधन मिळत असेल, तर दिशा काम करेल असे तिच्या नवऱ्याने निर्मात्यांना सांगितले होते. त्यामुळे निर्मात्यांनी नवीन कलाकाराला दयाबेनच्या रोलसाठी निवडण्याचा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)