तप महोत्सव मिरवणूक रथाचे ठिकठिकाणी स्वागत

सोनई – येथे प्रियसाधनाजी म.साब. यांचा जैन स्थानकात चातुर्मास सुरू आहे. त्यांच्या प्रेरणेने मनीषा चंगेडिया यांनी 31 दिवस उपवास करून, त्यांची पचकवणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांची सजावट केलेल्या रथातून मिरवणूक काढून समाजबांधवांनी ठिकठिकाणी स्वागत करून, तप महोत्सव उत्साहात साजरा केला.

सोनईत 28 वर्षानंतर प्रथमच 31 दिवस अन्न न खाता, केवळ सुर्यास्तापर्यंत गरम पाणी पिणे, अशा पध्दतीने उपवास करतात, त्या अतिशय धार्मिक वृत्तीच्या आहे. याप्रसंगी धार्मिक परंपरेनूसार जैन बांधवांनी दर्शनाचा लाभ घेतला. या कालावधीत प्रियसाधनाजी यांनी जीवनातील तपाचे महत्व, त्याचा परिणाम या गोष्टी समजावून सांगितल्या.

-Ads-

कार्यक्रमासाठी नगर, नेवासे आदी तालुक्‍यांतून जैन श्रावक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष नवनीत सुरपुरीया, युवा कार्यकर्ते सचिन देसरडा, घोडेगावचे सरपंच राजेंद्र देसरडा, राजू गुगळे, शिवा बाफना, किरण चंगेडिया, महावीर चोपडा, मुकेश भळगट, मनोज चंगेडिया, ललित चंगेडिया, रितेश भळगट, राजू चोपडा, नितीन चंगेडिया, तेजकुमार गुंदेचा, संतोष बंग, महावीर नहार, रौनक चोपडा, विशाल सुरपूरीया आदीसह वर्धमान जैन श्रावक संघ, महिला मंडळ, युवक मंडळ यांनी परिश्रम घेतले. गुरू महाराज यांच्या मांगलिक मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)