नानाला क्लीन चिट दिल्याने तनुश्री दत्ता संतप्त; म्हणाली…

मुंबई – मी टू मोहिमेअंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत ओशिवरा पोलिसांनी आज न्यायालयामध्ये बी समरी अहवाल सादर केला असून त्यात नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावे नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान ओशिवरा पोलिसांनी सादर केलेल्या या अहवालाबाबत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने प्रतिक्रिया दिली असून तिने पोलिसांना व न्यायव्यवस्थेला भ्रष्ट ठरवलं आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली असून तनुश्री दत्ता पोलिसांनी सादर केलेल्या बी समरी अहवालाबाबत प्रतिक्रिया देताना म्हणते की, “भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि भ्रष्ट न्यायव्यवस्था भ्रष्ट नाना पाटेकरला क्लीन चीट प्रदान करते. नाना पाटेकरविरोधात याआधी देखील चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी धमकावणे, त्रास देणे अशाप्रकारच्या तक्रारी केल्या असताना त्याला निर्दोष करार दिलं जातं.”

तत्पूर्वी, “मी टू’ मोहिमेंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात १० ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांविरोधात पोलिसांतर्फे भा.दं.वि. कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

https://twitter.com/ANI/status/1139122511835041792

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)