प्रभागात टॅंकर, त्यांना “साकळाई’ कधी समजणार

डॉ. सुजय विखेंनी साधला आमदार संग्राम जगतापांच्या कार्यपद्धतीवर निशाणा

आमदार कर्डिलेंवर तोंडसुख
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर तालुक्‍यात आमदार शिवाजी कर्डिले आणि त्यांच्याविरोधात असलेली शिवसेना महाआघाडी पुन्हा समोरासमोर आली आहे. या महाआघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे, बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे यांनी आमदार कर्डिलेंवर जोरदार टीकास्त्र सोडून तोंडसुख घेतले.

चिचोंडी पाटील – नगर तालुक्‍यासह दक्षिण भागातील पाण्याचा प्रश्‍न अत्यंत गंभीर आहे. साकळाई योजनांसह इतर योजना मार्गी लावण्यासाठी केंद्रातूनच निधी आणावा लागणार आहे. स्थानिक-बाहेरचा वाद करण्यापेक्षा या विषयावर चर्चा होणे आवश्‍यक आहे. चार वर्षे आमदार आणि महापौर असतानाही जे स्वत:च्या प्रभागातील पाणीप्रश्‍न आजही सोडवू शकले नाहीत. टॅंकरने पाणी देतात, ते तुमचा साकळाई योजना कशी मार्गी लावणार? असा सवाल करत डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार संग्राम जगातप यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-भाजप युतीचे उमेदवारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ नगर तालुक्‍यात स्नेहमेळावा झाला. डॉ. सुजय विखे पाटील, माजीमंत्री बबनराव पाचपुते, उपनेते अनिल राठोड, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी हापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, अनिल कराळे, संभाजी कदम, नगरसेवक संजय शेंडगे, अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, नगरसेवक योगीराज गाडे, सचिन शिंदे, सभापती रामदास भोर, उपसभापती प्रवीण कोकाटे, शरद झोडगे, तालुका प्रमुख राजू भगत आदी उपस्थित होते. प्रा. गाडे म्हणाले, “डॉ. सुजय विखे हे सुशिक्षित असून तेच नगर तालुक्‍यासह शहराचे प्रश्‍न सोडवू शकतात. शेंडीच्या मेळाव्यात जावयावरची टीका सहन केली जाणार नसल्याचे सांगितले.” टीका सहन होत नसेल तर स्टेजवर येता कशाला. सहन होत नसेल, तर कापसाचे बोळे कानात घाला, असाही टोला त्यांनी मारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)