तानाजीचा रिलीज पुढे ढकलला

अजय देवगणच्या “तानाजी : द अनसंग हिरो’ची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा काही ना काही कारणामुळे चर्चेत राहिला आहे. या सिनेमासाठी अजय देवगणने खूप कष्ट घेतले आहेत. आतापर्यंत सिनेमाचे निम्म्यापेक्षा अधिक शुटिंग पूर्ण झाले आहे. 22 नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होणार असे गृहित धरून त्याची तयारी सुरू होती. मात्र आता ही रिलीजची तारीख पुढे ढकलायला लागली आहे.

हा सिनेमा आता पुढच्या वर्षी 10 जानेवारीला रिलीज होणार आहे, असे समजले आहे. नियोजित वेळापत्रकापेक्षा तब्बल दोन महिने उशीरा सिनेमा रिलीज होणार असल्याने अजयच्या फॅन्सना थोडी जास्त वाट बघायला लागणार आहे. शिवाय नरसिंह तानाजी मालुसरेच्या जीवनावरील सिनेमा असल्यामुळे प्रेक्षकांना त्याची विशेष उत्सुकता आहे. “तानाजी : द अनसंग हिरो’मध्ये नरवीर तानाजीचा रोल अर्थात स्वतः अजय देवगण करतो आहे, तर सैफ अली खान खलनायकाचा म्हणजे सिंहगडाचा किल्लेदार सरदार उदयभानाचा रोल तो करतो आहे. सिनेमाचा रिलीज पुढे ढकलावा लागण्यामागे नेमके काय कारण आहे, हे काही समजू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)