गंगा नदीत बुडता बुडता वाचली हॉलिवूडची अॅॅक्ट्रेस टॅमी बार्टिया

हॉलिवूडची अॅॅक्ट्रेस टॅमी बार्टिया सध्या भारतात आली आहे. काही दिवसांपूर्वी ती वाराणसीला गेली होती. डायरेक्टर अतुल गर्गच्या “द लीजेंड ऑफ पीकॉक’साठी तिला शुटिंग करायचे होते. तिथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर आपल्या मित्रपरिवारासह मौजमस्ती करताना तिला एकदम पोहण्याची हुकी आली. एरवी स्वीमिंग पूलमध्ये सुरक्षित पोहणाऱ्या टॅमीला गंगा नदीच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाजच आला नाही. थोडावेळ पोहण्याचा आनंद घेतल्यावर तिला दमायला झाले आणि ती चक्क बुडायला लागली.

-Ads-

यावेळी अतुल गर्ग आणि त्याचा कॅमेरामन सिनेमाचा लोकेशन बघण्यामध्ये गढलेले होते. टॅमी इतक्यात इथे होती, ती गेली तरी कोठे हे ते बघायला लागले. टॅमी पाण्यामध्ये बुडते आहे, हे बघितल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता शुटिंगच्या युनिटने टॅमीला पाण्याबाहेर काढले. टॅमी सुरक्षित राहिली, याबद्दल सगळ्यांनाच हायसे वाटले. टॅमीचा मात्र जीव अगदी घाबराघुबरा झाला होता. स्वतः अतुल गर्गनी ही घटना माध्यमांना सांगितली. ज्या असिस्टंटने टॅमीला सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढले, त्याचेही अतुल गर्गनी कौतुक केले आहे.

“लीजंड ऑफ पीकॉक’ हा अतुल गर्गचा पहिलाच हॉलिवूडपट आहे. या बिग बजेट सिनेमाचे काही शुटिंग भारतात, तर काही अन्य देशांमध्ये होणार आहे. त्यातील काही भागाचे शुटिंग वाराणसीमध्ये झाले. या सिनेमाबद्दल अद्याप म्हणावी तशी माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. यामध्ये काही भारतीय कलाकार असण्याचेही ऐकिवात आले आहे. मात्र, त्याचाही तपशील देण्यात आलेला नाही. अद्याप टॅमीच्या नावावर भारतीय उपखंडातील एखाद्या सिनेमाची नोंद झालेली नव्हती. तिने अमेरिकेव्यतिरिक्त् अन्य देशातील कोणत्याही सिनेमामध्ये काम केल्याचेही ऐकिवात नव्हते. तिच्यासाठी ही संधी म्हणजे करिअरच्या कक्षा रुंदावण्याची संधी आहे. मात्र या अपघाताच्या घटनेमुळे तिच्या जीवावरच बेतले होते. हा सिनेमा तिला वेगळ्या अर्थाने लक्षात राहणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)