भारतीय डाॅक्टर्सनी महिलेच्या पोटातून काढला 33 किलोंचा ट्यूमर

नवी दिल्ली – तामीळनाडू शहरातील कोईमतूर शहरात एका महिलेच्या पोटातून 33.5 किलोचा ट्यूमर काढण्यात आला आहे. हा जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्यूमर असल्याचे सांगण्यात येत आहे. उटी शहरात राहणारी महिला ही शेतकरी आहे, तिला अनेक दिवसांपासून चालताना-फिरताना आणि श्वास घेण्यात त्रास होत होता.

जेव्हा ही महिला तपासणीसाठी रूग्णलयात आली तेव्हा तिच्या पोटात मोठा ट्यूमर असल्याचे कळाले. त्यानंतर तिला रूग्णलयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सुमारे 3 तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून ट्यूमर काढण्यात आला. ट्यूमर काढल्यानंतर त्याचे वजन 33.5 किलो भरले गेले.

-Ads-

आता पर्यंतच्या रेकाॅर्डमध्ये भारतात रूग्णाच्या पोटातून फक्त 20 किलोंचा ट्यूमर काढण्यात आला होता. मात्र 33.5 किलोंच्या या ट्यूमरनंतर एक नवीन रेकाॅर्ड बनले आहे. हे रेकाॅर्ड इंडियन बुक आॅफ रिकाॅर्ड आणि एशियन बुक अाॅफ रिकाॅर्डमध्ये नोदंविदण्यात आले आहे. यानंतर याला वर्ल्ड बुक आॅफ रिकाॅर्डस आणि गिनीज वर्ल्ड रिकाॅर्डमध्ये समावेश करण्यासाठी पाठविण्यात आलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)