तमिळनाडूतील पोटनिवडणूक पुढे ढकलली

चेन्नई – निवडणूक आयोगाने तमिळनाडूतील तिरुवर विधानसभा मतदरासंघाची पोट निवडणुकीची तीन जानेवारीची अधिसूचना रद्द केली आहे. आता ही निवडणूक 28 जानेवारी रोजी पार पडेल.

एम. करुणानिधी यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर या मतदारसंघात निवडणूक आयोगाने पोट निवडणूक घोषित केली.

परंतु इथे गज वादळाने थैमान घातल्याने सर्व राजकीय पक्षांनी ही पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. वादळामुळे निवडणुकीच्या कामकाजावर प्रभाव पडू शकतो अशी भीती राजकीय पक्षांनी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)