तमन्ना म्हणते, मी सिंधी आहे!

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने वर्सोवामधील एका इमारतीत दुप्पट किंमत मोजून एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. तमन्नाने प्रति चौरस फुटांसाठी 80 हजार 778 रुपये मोजले अशी चर्चा होती. यावर तमन्नाने पहिल्यांदाच मौन सोडले आहे. मी सिंधी आहे घरासाठी दुप्पट किंमत कशी मोजेन, असे तमन्ना म्हणाली.

मी घर घेतले आहे ही गोष्ट खरी आहे. सध्या घराचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर माझे कुटुंब घरात राहायला जाणार आहे. मी घरासाठी दुप्पट किंमत मोजली अशा बातम्या नेहमीच चर्चेत आहेत. मला माझ्या शिक्षकांनी देखील याबद्दल विचारले होते. मी त्यांना म्हणाले मी सिंधी आहे त्यामुळे घरासाठी दुप्पट किंमत मोजणे शक्‍यच नाही, असे तमन्ना म्हणाली. तमन्नाने वर्सोवा जुहू लिंक रोडवरील एका आलिशान इमारतीत घर घेतले असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले होते. या फ्लॅटची मूळ किंमत ही जवळपास 4.56 कोटी होती तमन्नाने 16.60 कोटींना हे घर विकत घेतले असल्याचे संबधित वृत्तपत्राने म्हटले होते.

याबरोबर तमन्ना या घराच्या इंटिरिअरसाठी 2 कोटी रुपये मोजणार असल्याचेही समजत आहे. जुहू, वर्सोवा भागात आलिया भट्ट, विवेक ओबेरॉयसह अनेक बॉलिवूड कलाकारांची घरे आहेत. यापूर्वी अभिनेत्री आलिया भट्टने देखील दुप्पट किंमत मोजून या भागात घर खरेदी केले होते. तमन्नाने 99.60 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणूनही भरले आहेत. ही इमारत 22 मजल्यांची असून तिच्या चहूबाजूंनी समुद्रकिनाऱ्याचे दर्शन होते. तमन्नाने घर घेतले असल्याचे जरी मान्य केले असले तरी यासाठी दुप्पट किंमत मोजल्याचे वृत्त नाकारले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)