#चर्चेतील चेहरे: भारतीय वंशाचे युवा गणिततज्ञ ‘अक्षय वेंकटेश’ 

गेल्या आठवड्यात गणितातील नोबेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “फिल्ड मेडल’ पुरस्काराने चार गणिततज्ञांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये अक्षय वेंकटेश या भारतीय वंशाच्या युवा गणित तज्ञाचा समावेश आहे. “फिल्ड मेडल’ हा पुरस्कार दर चारवर्षांनी 40 वर्षांखालील गणित तज्ञांना देण्यात येतो. भारतीय वंशाच्या अक्षय वेंकटेश यांना हा सन्मान मिळाला आहे.
दिल्लीमध्ये जन्म झालेले 36 वर्षीय अक्षय वेंकटेश सध्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गणितातील व्यापक योगदानाबद्दल त्यांना या प्रसिद्ध पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. रिओ डी जनेरिओ येथील पुरस्कार वितरणाच्या समारंभामध्ये अक्षय वेंकटेश यांना दिलेल्या मानपत्रामध्ये त्यांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला.
अक्षय वेंकटेश यांच्या शिवाय मूळ कुर्दिश वंशिय आणि केंब्रिज विद्यापिठातील प्राध्यापक कौचर बीरकर, युनिव्हर्सिटी ऑफ बोनमधील प्राध्यापक जर्मनीचे पीटर स्चोझ आणि इटलीचे गणिततज्ञ ऍलेसिओ फिगाली यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॅनडाचे गणिततज्ञ जॉन फिल्ड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1932 पासून हा पुरस्कार दर चार वर्षांनी दिला जातो. या सन्मानाच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या अक्षय वेंकटेश यांचा आतापर्यंतचा गणितातील प्रगतीचा आलेख थक्क करणारा आहे. दिल्लीत जन्म झालेले अक्षय वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे आपल्या पालकांसमवेत स्थायिक झाले.
शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या फिजिक्‍स आणि मॅथ्सच्या ऑलिम्पियाडमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि वयाच्या अवघ्या 11, 12 व्या वर्षी या दोन्ही ऑलिम्पियाडमध्ये पदक जिंकले. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीमध्ये पदवीचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर 1997 साली वयाच्या 16 व्या वर्षी गणितातील पदवीही त्यांनी संपादित केली.
2002 साली अक्षय वेंकटेश यांनी वयाच्या 20 व्या वर्षी पी.एचडी पण मिळवली होती. तेंव्हापासून एमआयटीमधील पोस्ट डॉक्‍टरेटपासून क्‍ले रिसर्च फेलो आणि सध्या स्टॅनफोर्ड युनिर्व्हसिटीमधील प्राध्यापकपर्यंत त्यांची कारकिर्द सुरू आहे. अक्षय वेंकटेश यांनी गणितातील सर्वाधिक आकडेवारीच्या सिद्धांतांवर काम केले आहे. अंकगणित, भूमिती, टोपोलॉजी, ऑटोमॉर्फिक फॉर्म्स आणि इर्गोडिक थिअरीसारख्या अत्यंत क्‍लिष्ट आणि गुंतागुंतीच्या सिद्धांतांवर अक्षय यांचे काम सुरू असते. त्यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामध्ये ओस्ट्रोवस्की प्राईझ, इन्फोसिस प्राईझ, सालेम प्राईझ आणि शास्त्र रामानुजन प्राईझ यासारख्या पुरस्कारांचा समावेश आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)