प्रियंकांबाबत बोलताना बिहारच्या मंत्रीमहोदयांची जीभ घसरली

पटना : काँग्रेसतर्फे काल प्रियंका गांधी-वढेरा यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्यापासून भारताच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये चोहीकडे प्रियंका गांधी यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. एकीकडे अनेक राजकीय जाणकारांनी प्रियंका यांचा सक्रिय राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश काँग्रेससाठी लाभदायक ठरणार असल्याचे भाकीत केले आहे. तर दुसरीकडे अनेकांनी प्रियंका यांचा राजकारणातील प्रवेशाने कोणताही फरक पडणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, नितेश कुमार यांच्या बिहार सरकारमधील मंत्री विनोद नारायण झा यांनी प्रियंका गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. एका खाजगी वृत्तवाहिनीला प्रियंका यांच्या काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना झा यांनी प्रियंका गांधी-वढेरा यांच्या नावाचा एकेरी उच्चार करत, “केवळ चांगला चेहरा असल्याने मतं मिळतात का हे येणारा काळच सांगेल? प्रियंकाला थेट सरचिटणीस पदी बसवण्यात आलं. तिच्याकडे या पदासाठी कोणता अनुभव आहे? राजकारणाचा या लोकांनी पोरखेळ बनवून ठेवला आहे.” असे विवादित वक्तव्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)