तालिबानीनी उडवले पूल-काबुलचा तीन प्रांताशी संपर्क तुटला

संग्रहित छायाचित्र

काबुल (अफगाणिस्तान): राजधानी काबुलच्या दक्षिण-पश्‍चिमेकडे तालिबानींनी सुरक्षा दलांवर जोरदार हल्ले केले आहेत. अनेक पूल उडवून दिल्याने काबुलचा तीन प्रांतांशी सडक-संपर्क तुटला आहे. शनिवारी रात्री तालिबानींनी हल्ले केल्याची माहिती प्रांतीय राज्यपालांचे प्रवक्ते अब्दुल रहमान मंगेल यांनी दिली आहे.

तालिबानींनी सैयद आबाद जिल्हा मुख्यालयावर ताबा मिळवल्याचा दावा केला असला, तरी स्थानिक अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावला आहे. तलिबानी आणि सुरक्षा दले यांच्यात चकमकी चालू असून जिल्हा पोलीस प्रमुखांसह सहा पोलीसकर्मी मारले गेल्याची माहिती गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नजीब दानीश यांनी दिली आहे.

-Ads-

तालिबानींनी पूल उडवून दिल्यामुळे काबुलचा गजनी, जाबूल आणि कंधार या तीन प्रांतांशी सडक-संपर्क तुटला आहे. चकमकींमुळे वरदक, लोगर, गजनी आणि पकतियामधील वीजपुरवठा खंडित झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)