काबुल: तालिबानी गनिमांनी अफगाणिस्तानातल्या जवझान प्रांतात सुरक्षा रक्षकांवर केलेल्या हल्ल्यात पंधरा पोलिस कर्मचारी ठार झाले तर अन्य दहा जण जखमी झाले. सोमवारी रात्री उशिरा कश तायपा जिल्ह्यात हा हल्ला झाल्याची माहिती या प्रांताच्या पोलिस प्रमुखांनी दिली. एकाचवेळी सुरक्षा ठिकाणांवर अचानक असे हल्ले करून या जिल्ह्याचा ताबा घेण्याचा तालिबानचा प्रयत्न होता पण फसला असल्याचेही त्यांनी सांगितले.
तालिबानचा प्रवक्ता झैबुल्लाह मुजाहिद याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात पोलिसांची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचा दावा त्याने केला आहे. दक्षिण गझनी प्रांतातील एका पोलिस छावणीवरही तालिबान्यांनी सोमवारी हल्ला केला त्यात तीन पोलिस कर्मचारी ठार झाल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0