तालिबानशी तत्वत: समझोता !

अमेरिकेच्या मध्यस्थाने काबुलमध्ये दिली माहिती

काबुल : तालिबानी बंडखोर आणि अमेरिका यांच्यात तत्वत: समझोता झाला असल्याची माहिती अमेरिकेचे मध्यस्थ दूत झालमे खलिलजाद यांनी आज काबुलमध्ये दिली. गेली 17 वर्षे अफगाणिस्तानात जी युद्धसदृश स्थिती आहे ती समाप्त करण्यासाठी ही एक महत्वाची घडामोड मानली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खलिलजाद यांनी या संबंधात एक निवेदन जारी केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या आठवड्यात कतारमध्ये तालिबानच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. त्यात आपण तालिबानी प्रतिनिधींकडे तुम्ही अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्याशी थेट शांतता चर्चा करावी असा आग्रह धरला तो त्यांनी मान्य केला आहे असे खलिलजाद यांनी म्हटले आहे.
तथापि आपण तालिबानी नेत्यांशी चर्चा करण्यास तयार असलो तरी अफगाणि नागरीकांच्या हक्कांशी आपण तडजोड करणार नाही असे अध्यक्ष घनी यांनी म्हटले आहे.

खलिलजाद यांनी न्युयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की अफगाण सरकार आणि तालिबान यांनी कोणत्या चौकटीत शांतता चर्चा करावी या विषयी आमच्या चर्चेत तत्वत: समझोता झाला आहे. अफगाणी भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करू दिला जाणार नाही अशी ग्वाहीही तालिबानी गनिमांनी दिली आहे असे ते म्हणाले. अफगाणिस्तानचे सरकार आणि तालिबानी गनिमांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू होंऊन तेथे शस्त्रसंधी करार झाल्यानंतर अमेरिकेचे येथील सैन्य पुर्ण माघारी घेतले जाईल असे खलिलजाद यांनी म्हटले आहे.

आम्हाला या बाबतीत अजून तेथे बरेच काम करायचे बाकी आहे अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. तथापि तालिबानने दिलेला प्रतिसाद उत्त्साहवर्धक आहे असे ते म्हणाले. तालिबानी गनिमांशी झालेल्या चर्चेविषयी खलिलजाद यांनी नाटो फौजांच्या प्रतिनिधींनाही माहिती दिली आहे. पण आम्ही तेथून इतक्‍यात माघारीची घोषणा करण्याची शक्‍यता नाही असेही या प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)