अमेरिकेच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्याची तालिबान्यांची कबुली 

अफगाणच्या प्रश्‍नावर तोडग्याची प्रक्रिया सुरू

काबुल  – गेले अनेक वर्ष अफगाणिस्तानात तालिबान विरूद्ध सरकार असा रक्तरंजीत संघर्ष सुरू आहे. या संघर्षावर तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यात अमेरिका मध्यस्थी करीत आहे. तालिबान्यांच्या एका शिष्टमंडळाने अलिकडेच कतारमध्ये अमेरिकेचे अफगाणिस्तानातील दूत झालमेय खलिझाद यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. आणि विशेष म्हणजे तालिबान्यांनी या वृत्ताला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. अमेरिकेने खलिझाद यांना केवळ तालिबानशी शांतता चर्चा करण्यासाठीच तेथे आपला दूत म्हणून नेमले आहे.

-Ads-

पाकिस्तान आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीने अमेरिकेला तालिबान्यांना चर्चेच्या टेबलावर आणण्यात प्रथमच यश आले आहे. त्यानुसार तालिबानचे एक प्रतिनिधीमंडळ गेल्या शुक्रवारी दोहा येथे अमेरिकन प्रतिनिधींना भेटल्याची कबुली तालिबानचा प्रवक्ता झैबुल्लाह मुजाहिद याने दिली. दोन्ही बाजुंमध्ये झालेल्या या चर्चेला अद्याप कोणत्याही बाजूने दुजोरा दिला नव्हता परंतु आज अखेर तालिबाननेच हा दुजोरा दिला आहे. तथापी अमेरिकन प्रतिनिधींनी मात्र याविषयावर कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे. गेली 17 वर्ष सुरू असलेला हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी यापुढेही चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार आहेत. दोहा मध्ये झालेल्या चर्चेच्यावेळी अफगाणिस्तानात पुर्ण शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणकोणते पर्याय असू शकतात यावर प्राथमिक चर्चा झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)