तालिबान्यांनी गजनीत केले 125 शालेय कर्मचाऱ्यांचे अपहरण 

प्रातिनिधिक छायाचित्र

गजनी  – तालिबान्यांनी गजनी जिल्ह्यातील 125 शालेय कर्मचाऱ्यांचे अपहरण केले आहे. या 125 कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पूर्व प्रांतीय परिषदेचे सदस्य नादर खान गिरुवल यांनी ही माहिती दिली आहे. या शालेय कर्मचाऱ्यांच्या पगारातील वाटा तालिबानींना मिळत नसल्याने त्यांचे अपहरण करण्यात आलेले आहे.

या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बॅंकेत जमा होते. ते तसे न करता शाळेतील कॅशियरकडून रोख स्वरूपात घ्यावे, ज्यामुळे तालिबान्यांना त्यांचा वाटा मिळू शकेल, असे तालिबान्यांनी या सर्वांना सांगितले होते. मात्र तरीही त्यांचे वेतन बॅंकेत जमा होत राहिल्याने तालिबान्यांनी त्यांचे अपहरण केले. उप प्रांतीय परिषदेचे प्रमुख अमानुल्लाह कामरानी यांनी 125 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेले दोन दिवस बेपत्ता असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार अपहरण केलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तालिबान्यांनी सोडून दिले असल्याचे राज्यपाल  मोहम्मद अरिफ नूर यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)