आधी पुनर्वसन, मगच कारवाई – माजी राज्यमंत्री मदन बाफना

तळेगाव दाभाडे : अतिक्रमण ग्रस्तांच्या पुनर्वसन बैठकीत बोलताना माजी राज्यमंत्री मदन बाफना. या वेळी किशोर भेगडे, कृष्णा करके, सुरेश चौधरी उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांना चपराक : अतिक्रमण कारवाई विरोधकांनी दंड थोपटले

तळेगाव दाभाडे – येथील नगरपरिषदेच्या वतीने मागील महिन्यापासून स्टेशन परिसर, तळेगाव-चाकण मार्गालगत, भाजीमंडई तसेच पैसा फंड काचा कारखान्याजवळील टपरी, हॉटेल, दुकाने व घरांवर करण्यात आलेली अतिक्रमण कारवाई चुकीच्या पद्धतीची असून, ही कारवाई त्वरित थांबवून ज्यांच्यावर कारवाई केली त्यांचे त्वरित पुनर्वसन तसेच नुकसानभरपाई दया, अन्यथा मंगळवारी (दि. 18) तळेगाव दाभाडे-चाकण राज्यमार्ग रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी दिला. त्यामुळे नगरपरिषदेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात विरोधक आक्रमक झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरपरिषदेच्या सभागृहात शनिवारी (दि. 15) आयोजित अतिक्रमण ग्रस्तांच्या पुनर्वसन बैठकीत ते बोलत होते. या वेळी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, सुरेशभाऊ चौधरी, नगरसेवक अरुण माने, आनंद भेगडे, वैशाली दाभाडे, अशोक काकडे, जितेंद्र खळदे, दिलीप राजगुरव, सुदर्शन खांडगे, नंदकुमार कोतुळकर, दिलीप खळदे, किशोर राजस, ऍड. सचिन नवले, सुमीत परबते, आनंद देशमुख, धनंजय देशमुख, आशिष पाठक, दिलीप कुल, जगदीश कोराड, शिवाजी आगळे, धोंडिबा मखामले, मिलिंद अच्युत, दीपक काकडे तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

माजी राज्यमंत्री बाफना म्हणाले की, ऐन हिवाळ्यात अतिक्रमण कारवाई करून त्यांचा संसार उघड्यावर आणला. नगरपरिषदेच्या सत्तारूढ पक्षाचा कारभार हा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी प्रशासनाचा गैरवापर केला जात आहे. गरिबांवर अतिक्रमण कारवाई; पण धनदांडग्यांवर अतिक्रमण कारवाई नाही. ज्यांच्यावर अतिक्रमण कारवाई केली त्यांच्यासाठी लढण्यास आम्ही खंबीर आहे.
ऍड. सचिन नवले, दिलीप राजगुरव यांनी मनोगत व्यक्‍त केले.

“सत्तारूढ आमदार व नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईबाबत मूग मिळून गप्प बसले आहेत. मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अतिक्रमण कारवाई करून गरीब, गरजूंना उद्‌ध्वस्त केले आहे. अतिक्रमण कारवाईच्या वेळी त्यांना त्यांचे साहित्य बाजूला काढू दिले नाही. नगरपरिषदेने जुलमी कर वाढ करून नागरिकांची आर्थिक लूट केली आहे. 33 हजार मालकी हक्‍काच्या मिळकतीपैकी 11 हजार मिळकत धारकांनी हरकत घेतली आहे. सत्तारूढ पक्षाला तळेगावकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न सोडविण्यात यश आले नाही. सुभाष मार्केट बांधकामात 4.5 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. अतिक्रमण कारवाई करणाऱ्या बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करणार आहे.                                        -किशोर भेगडे ,नगरसेवक .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)