तळेगावातील ‘बिस्किट गॅंग’वर मोक्‍का !

सात जणांवर कारवाई : सोन्याचे बिस्किट देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा

तळेगाव दाभाडे  – सोन्याचे बिस्कीट कमी पैशात देण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातला. फसवणूक आणि मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील “बिस्कीट गॅंग’वर मोक्‍का अंतर्गत कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये प्रथमच मोक्‍कांतर्गत कारवाई केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकाश उर्फ पिंट्या गोपाळ साळवे (वय 48, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ), महेंद्र गोपाळ साळवे (वय 52), आकाश प्रकाश साळवे (वय 22), सिद्धार्थ महेंद्र साळवे (वय 22), तेजस प्रकाश साळवे, मीनाक्षी प्रकाश साळवे व संजय कार्ले यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोक्‍का) ची कारवाई करण्यात आली आहे.
देहुरोड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्‍त गणपत माडगूळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “बिस्कीट गॅंग’ टोळीचा प्रमुख प्रकाश उर्फ पिंट्या साळवे आणि त्याच्या साथीदारांनी तळेगाव दाभाडे, निगडी, देहुरोड आदी पोलीस ठाण्यामध्ये सात गुन्हे दाखल आहेत.

प्रथम खरे सोन्याचे बिस्कीट कमी पैशात देऊन त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यांना अधिकाधिक सोने घ्या, असे बोलून त्यांच्याकडून लाखोंच्या रक्‍कम घेऊन फिर्यादीची फसवणूक करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणे, विनयभंग, आत्महत्येस प्रवृत्त करणे, घातक शस्त्र बाळगणे आदी गुन्हे दाखल आहे.

या बिस्कीट गॅंगने अनेकांना गंडा घातला असून, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन, अप्पर आयुक्‍त मकरंद रानडे, उपायुक्‍त नम्रता पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्‍त गणपत माडगूळकर, पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी “बिस्कीट गॅंग’च्या प्रमुखासह त्यांच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (मोक्‍का) ची कारवाई करण्यात आली. प्रस्ताव लिखान करण्याचे काम सहाय्यक फौजदार विनोद शिंदे यांनी केले.

यातील आरोपी अद्यापही अटक नाहीत, त्यांना त्वरित अटक करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्‍त गणपत माडगूळकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य प्रथमच देहुरोड उपविभागीय कार्यालयात एका वर्षात सहाय्यक पोलीस आयुक्‍त गणपत माडगूळकर यांनी आठ गुन्हेगारी टोळ्यावर मोका अंतर्गत कारवाई करून 59 गुन्हेगारांची कारागृहात रवानगी केली.

देहुरोड येथील अरुण हस्ततोडीया टोळीच्या आठ आरोपींवर, पौंड येथील मयुर गोळे टोळीच्या पाच आरोपींवर, चिखली येथील अविनाश शिंदे टोळीच्या चार आरोपींवर, कोथरूड येथील भगवान मरगळे टोळीच्या तीन आरोपींवर, तळेगाव दाभाडे येथील अनिकेत जाधव, विनोद गायकवाड रावण गॅंग टोळीच्या 29 आरोपींवर, इंदोरी येथील जी. टी. बॉइज गणेश तांगडे टोळीच्या पाच आरोपींवर, लोणावळा येथील लाक्‍कडसिंग दुधाने टोळीच्या आठ आरोपींवर, तळेगाव दाभाडे येथील विजय उर्फ छल्ल्या चव्हाण टोळीच्या पाच आरोपींवर, कोटेश्‍वरवाडी येथील श्‍याम दाभाडे टोळीचा आरोपी माऊली गायकवाड यांच्यावर मोक्‍काची कारवाई केली. सर्वच गुन्हेगार कारागृहात केले असून, गणपत माडगूळकर यांच्या कारवाईने त्यांची सिंघम अधिकारी अशी ओळख निर्माण झाली आहे. गुन्हेगारीवर त्यांची दहशत केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)