तलाठी कार्यालये बनली केवळ हेलपाटे केंद्र

नागठाणे –  सातारा तालुक्‍यात सुमारे 214 गावातील कार्यालयात केवळ 78 तलाठी कार्यरत आहेत. प्रत्येक तलाठ्यावर चार ते पाच गावांचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. अपुरी कर्मचारी संख्या असल्याने ही गाव पातळीवरील महत्वाची असणारी तलाठी कार्यालये सामान्य नागरिकांसाठी हेलपाटे केंद्रे बनली आहेत.

शेतकऱ्यांची कामे वेळेवर व्हावीत व सर्वसामान्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी शासनाने प्रत्येक गावासाठी एक तलाठी नेमले आहेत. सातारा तालुक्‍याचा कारभार तहसील कार्यालयाच्या मार्फत होत असुन या कार्यालयातुन सुमारे 14 मंडले निर्माण केली आहेत. या मंडलात विभागून सुमारे 214 गावांचा कारभार तलाठ्यांमार्फत होत असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या गावांना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना समस्या भेडसावत असून येथील कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. केवळ 78 कर्मचारी तालुक्‍याच्या कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यावरील कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे प्रलंबित राहत आहेत.

रोज नागरिक येतात, पण कर्मचारी उपस्थित नसतात. त्यामुळे कारभार हा रामभरोसे असल्याने नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. गावांना सेवा देणारे येथील कार्यालयातूनच शेतजमिनीचे विविध दाखले, जमिनीचे उतारे, दस्तनोंदणी, रहिवासी दाखले, उत्पनाचे उतारे, विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले, जातीचे दाखले, वारस नोंदी, भुसंपादनाबाबतचे दाखले नमूने देण्याचे काम केले जाते. अशा कामांना लोक या कार्यालयाची पायरी चढत असतात, मात्र एका कामासाठी लोकांना शेकडो हेलपाटे मारावे लागत असतात. येथील कर्मचारी केव्हा येणार हे कोणालाच माहीत नसते तर अनेक कर्मचारी ऑफिस कामाच्या नावाखाली किंवा इतर गावांच्या चार्ज दिल्याच्या कारणाने नेमून दिलेल्या गावात फिरकत नसल्याची चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)