हेअर ट्रीटमेंट करून घेताय?

अलीकडे सरळ केसांची बरीच फॅशन आहे. त्यासाठी आपले केस तसे दिसावे म्हणून बऱ्याच तरुणी हेअर स्ट्रेटनिंग करून घेतात. हेअर स्ट्रेटनिंग करण्याच्या वेगवेगळे ट्रिटमेंट सध्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये ब्राझलियन ब्लोआऊट आणि कॅरोटिन ट्रिटमेंट अधिक लोकप्रिय होत असल्याचे दिसते. फॅशनच्या दृष्टीने वर्तमानानुसार फॅशन करणं यात गैर काही नाही. पण, त्याचा अतिरेक आरोग्याच्या दृष्टीने नक्‍कीच हानिकारक ठरू शकतो.

सरळ सुरसुळीत केसांसाठी करण्यात येणाऱ्या या ट्रिटमेंटमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. ब्राझिलियन ब्लो आऊट आणि कॅरोटिन ट्रिटमेंट या दोन्ही उपचारपद्धतीमध्ये केसांना सरळ आणि चकचकीत लूक येण्यासाठी कॅरोटिन लिक्‍विडचा वापर केला जातो. या उपचार पद्धतीनंतर साधारणपणे चार महिने केस सरळ राहतात. इतर उपचार पद्धतींच्या तुलनेत ही आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे, असे म्हटले जाते. पण ही गोष्ट अर्धसत्य आहे. कारण या ट्रिटमेंटमध्ये फॉर्मल्डेहाईड्‌सची उच्च राहते असे आढळून आले आहे. यामुळे संबंधित व्यक्‍तीला डोकेदुखी डोळ्यांची जळजळ आणी घशाला त्रास जाणवतो. अती प्रमाणात वापर केल्यास हा त्रास कॅन्सरपर्यंतही जावू शकतो.

स्ट्रेटनिंग करणे हे आरोग्याच्या दृष्टीने धोकेदायक आहे असे बऱ्याच हेअर स्टायलिस्टलादेखील वाटत असते. फॉर्मल्डेहाईडस हे रसायन शॅम्पू आणि इतर तत्सम उत्पादनांमध्येही असते. कॅरोटिन ट्रिटमेंटच्या वेळी अनेक प्रकारचे फ्यूम्स सोडले जातात. त्यामध्ये 17 ते 18 टक्‍के फॉर्मल्डेहाईडस असतो. 0.2 टक्‍के फॉर्मल्डेहाईडस शरीरासाठी सुरक्षित नसते. त्या तुलनेत हे प्रमाण बरेच जास्त दिसून येते. म्हणूनच अमेरिकेतील काही भागात आणि कॅनडामध्ये फॉर्मल्डेहाईडसवर बंदी घातल्याचे दिसून येते. हा धोका लक्षात घेता आपण कुठल्याही पार्लरमध्ये संबंधित उपचार घेताना किंवा प्रसाधनं घेताना प्रथम उत्पादनातील घटकांची माहिती करून घ्यावी. जेणेकरून भविष्यातील त्रास टाळता येऊ शकतात.

वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या ट्रिटमेंट्‌स, शॅम्पूचा अतिरिक्‍त वापर यामुळे केस खूप कोरडे होऊ शकतात. केस कोरडे होण्यामागची काही कारणे अशी आहेत. केसांच्या मुळाशी असलेल्या तेलग्रंथी अनेकदा पुरेशा कार्यरत नसतात. त्यामुळे योग्य प्रमाणात सीबम तयार होत नाही आणि परिणामी केस कोरडे राहतात. साबण किंवा तीव्र शॅम्पूचा अनियमित आणि अनियंत्रित वापरामुळे देखील केस कोरडे होतात. तेल, कन्डिशनिंग किंवा हेअर मॉईश्‍चरायझर न वापरता अनेकदा नुसतेच केस धुतले तरीही केस कोरडे होतात कारण यामुळे केसांवरील नैसर्गिक आवरण नष्ट होते. वाहनांवरून प्रवास करताना केस व्यवस्थित झाकले जातील याची काळजी घ्यायला हवी. अधिक वाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतरही केस कोरडे आणि निस्तेज होतात.

केस कोरडे झाले असल्यास आठवड्यातून किमान दोनदा केसांना आणि टाळूला तेल लावून हलक्‍या हाताने मसाज करावा. नारळाचं, तिळाचं तेल वापरण्याबरोबरच मक्‍याच्या तेलाचा उपयोगही अधिक फायदेशीर ठरू शकतो. रात्रभर केसांना तेल ठेवावे आणि सकाळी शॅम्पू करावा. शॅम्पू झाल्यानंतर कोरड्या केसांसाठी उपयोगी ठरेल असे कंडिशनिंग वापरावे. शक्‍यतो केस धुण्यासाठी अगदी कोमट पाणी वापरावे. अगदी गरम पाण्याने केस जास्त कोरडे होतात.

– अंजली महाजन

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)