तगडी स्टारकास्ट घेऊन करण जोहर दिग्दर्शित करतोय ‘हा’ चित्रपट

करण जोहरने नुकतेच धर्मा प्रोडक्शन अंतर्गत आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तख्त’ असे चित्रपटाचे नाव असून यामुळे बॉलीवूडचे अनेक दिग्गज कलाकारांना एकत्र बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. यासंबंधीची माहिती करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे दिली. ‘ये दिल है मुश्कील’ नंतर करण जोहर दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

‘तख्त’ या चित्रपटात रणवीर सिंह, करीना कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांसारखे बडे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटातून पहिल्यांदाच काका-भाची म्हणजेच अनिल कपूर आणि जान्हवी स्क्रीन शेअर करणार आहेत. तर ‘तख्त’ नावावरून हा चित्रपट ऐतिहासिक असणार यात काही शंका नाही. परंतु हा चित्रपट २०२० साली रिलीज होणार असल्याने प्रेक्षकांना बरीच वाट पाहावी लागणार आहे.

वृत्तानुसार, तख्त हा चित्रपट मुघल साम्राज्यावर आधारित असण्याची शक्यता आहे. यामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून करीना कपूर त्यांच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आलिया त्याच्या प्रेयसी दिसणार येणार आहे. विकी कौशल आणि जान्हवीची जोडी या चित्रपटातून प्रथमच एकत्र येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)